Home Breaking News अपघाताची मालिका सुरूच एकाचा जीव जाऊन ही प्रशासन झोपेतच आता पुन्हा अपघात...

अपघाताची मालिका सुरूच एकाचा जीव जाऊन ही प्रशासन झोपेतच आता पुन्हा अपघात झाल्याने दोन जन गंभीर जखमी, याकडे शासन लक्ष देईल की नाही नागरिकांमध्ये रोष

1023

 

यावल तालुका( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल : खड्ड्यांमुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील अपघाताची मालिका थांबतचं नाहिये तालुक्यातील किनगाव – चिंचोली दरम्यान अचानक खड्डा समोर आल्याने दुचाकीस्वार एक खड्ड् चुकवत दुसऱ्या खड्ड्यात गेला व दुचाकी अनियंत्रीत होत दोघे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले, जखमींना नागरीकांच्या मदतीने किनगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असुन दोघांवर प्रथमउपचार करून जळगाव हलवले आहे
अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे किनगाव जवळ एका तरुणाचा जीव गेला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री याचं रस्त्या चिंचोली – किनगाव दरम्यान रात्री दुचाकी क्रमांक एम. एच.१८ ए.आर. २७४० घेवुन जगन नानू धनगर वय ४७ व वसंत धनगर वय ४० दोघे राहणार साक्री जि. धुळे हे येत होते. अचानक समोर आलेले खड्डे पाहून ते घाबरले व एक खड्डा चुकवतांना दुचाकी दुसऱ्या खड्ड्यात जाऊन अनियंत्रित झाली व दोघेही रस्त्यावर कोसळले या अपघातात यांच्या डोक्याला दुखापत झाली व ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडून होते. तेव्हा या रस्त्या वरून मार्गस्त होत असलेल्या नबाब पिंजारी, छब्बीर तडवी, भावेश महाजन, धीरज महाजनख् गजानन पाटील सह नागरिकांनी तातडीने या दोघ गंभीर जखमींना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता दाखल केले येथे डॉ. मनीषा महाजन, सरदार कनाशा, मोहिनी धांडे, निलेश खंडारे आदींनी त्यांच्यावर प्रथमोउपचार केले असून त्यांना पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
खड्ड्यांमुळे अपघात.
या राज्य मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत आहे. तेव्हा अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वतीने ,जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत लक्षवेक मोटासायकल रॅली काढून निवेदन
Next articleहिंगणघाट तालुक्यात नकली विषारी दारू , गांजा जुवा, हुक्का पार्लर या व्यवसायात प्रचंड वाड ?