Home Breaking News भुसावळ येथे मुले पळवणारी टोळी म्हणजे निवड अफवा

भुसावळ येथे मुले पळवणारी टोळी म्हणजे निवड अफवा

164

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

भुसावळ शहरात लहान मुले अपहरण करणारी टोळी असल्याची अफवा पसरवली आहे मात्र कोणीही विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आल्याच्या अफवा पसरवत आहे यामुळे अन्य जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी वाटसरू भिकारी व अन्य निष्पाप लोकांना मारहाण झाली आहे यातुन जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अफवा फैलविणारे जर कोणी व्हायरल करीत असल्यास अशांची नावे माहिती असल्यास त्यांची नावे पोलिसांना कळवावी असे आव्हान पोलिसांनी केले आहे लोकांनी कायदा हातात घेऊ नये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे

Previous articleहिंगणघाट तालुक्यात नकली विषारी दारू , गांजा जुवा, हुक्का पार्लर या व्यवसायात प्रचंड वाड ?
Next articleव्यापारी गणेशजी कोटेच्या यांचा बोदवड तालुक्याचे वतीने करण्यात आला सत्कार