Home जळगाव JAlgaon Chandrkant Patil /आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन भानखेडा येथे...

JAlgaon Chandrkant Patil /आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन भानखेडा येथे शालेय साहित्य वाटप 

219

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड – तालुक्यातील भानखेडा येथेिल जिल्हा परिषद शाळेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचिित्त साधुन जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटपकरण्यात आले आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चंद्रकांत भाऊ पाटील जवळचे श्री.अमोल पाटील व चंद्रकांत पाटील समर्थक भानखेडा यांच्या कडून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (पाटी,कंपास पेटी, पाणी बाॅटल इतर शालेय साहित्य ) वाटप करण्यात आले. सोबत शाळेसाठी 2 पाण्याचे जार भेट देण्यात आले.
तसेच हिमजल अॅक्वा चे संचालक श्री.घनश्याम इंगळे यांची मुलगी प्रिक्षा हिचा आज पहीला वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वर्षभर 2 जार पाणी दररोज देण्याचे घनश्याम इंगळे यांनी जाहीर केले.
आज शाळेसाठी मदत करणारे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मित्र परिवाराचे प्रमुख श्री.अमोल पाटील यांचे आभार जिल्हा परिषद शाळेच्या वतिने व नागरिकांच्या वतिने करण्यात आले.

प्रसंगी अमोल पाटील, राहुल मतकर ,मोहन दोडके ,घनशाम इंगळे ,नामदेव मिसाळ ,देवराम निकम ,मंगेश मतकर ,विनोद पाटील ,योगेश पाटील ,पवन पाटील ,योगेश ढसाळ ,अतुल दोडके ,लोकेश पाटील ,गोरखनाथ गायकवाड ,तुषार पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Previous articleरेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आज नवीन आष्टी -अहमदनगर नवीन लाईनचे उद्घाटन आणि नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ:
Next articleअरे देवा!:सफरचंदाच्या पेट्या भरलेली ॲपे रीक्षाच बोदवड.मधून चोरट्यांनी लांबवली