Home जालना जालना तालुक्यातील श्रावण बाळ,निराधार,अपंग,विधवा,मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करणे बाबत,तहसीलदार...

जालना तालुक्यातील श्रावण बाळ,निराधार,अपंग,विधवा,मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करणे बाबत,तहसीलदार जालना यांना भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड यांच्यातर्फे निवेदन सादर:

258

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील श्रावण बाळ,निराधार,अपंग,विधवा,सेवा योजनेतील लाभार्थी मागील एक ते दोन वर्षापासून मंजूर किंवा पात्र झालेली आहेत.पण या सर्व लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.आजुनही त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नाही.त्याचे काय कारण असु शकते ? पण सदर लाभार्थ्यांनी मंजूर झाल्यानंतर सर्व कागदपत्राची पुर्ताता आपल्या कार्यालयाकडे सादर केलेली आहे.तरी पण आपले कर्मचारी बजेट नाही,येईल,होईल,बँकेत यादी पाठविली आहे.असे अनेक कारण वारंवार देत आहे.व अनुदान टाकण्यास टाळाटाळ करीत आहे.सदरील लाभार्थ्यांची जसे गोरगरीब,वचंती,शोषीत व कष्टकरी तसेच वयोवृध्द अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे,जर एक आठवडयामध्ये अनुदान जमा झाले नाही.तर आपल्या तहसिल कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल व या आंदोलनामध्ये जालना तालुकयातील पात्र असुन सुध्दा अनदान न मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचा या ठिकाणी आंदोलनामध्ये समावेश केला जाईल.तसेच आंदोलनामध्ये काही अनुच्चीत प्रकार घडल्यास याची जबाबदारी आपली व आपल्या तहसिल प्रशासनाची राहील.याची आपण नोंद घ्यावी, अशा अशियाचे निवेदन तहसीलदार जालना यांना भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तर्फे देण्यात आला आहे.या निवेदनावर तुकाराम राठोड,राजु राठोड,पांडूरंग आहेरकर,छबुराव राठोड,संजय रंधवे,लक्ष्मण राठोड ,शिवाजी राठोड,विष्णू राठोड,सचिन चव्हाण,श्याम पवार,नितीन पवार,गोरख जाधव,रमेश पवार,सुभाष चव्हाण,अनिल राठोड,गजानन चव्हाण,किशोर झोरे,संदीप चव्हाण सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Previous articleJalgaon Pik Nuksan/ येवती शिवारात अज्ञातांनी कपाशी पिक कापून फेकली.
Next articleबोदवड येथे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार