Home Breaking News विवाहितेस फाशी देऊन मारले… आरोपींनाही फाशी द्या … नातेवाईकांची मागणी…

विवाहितेस फाशी देऊन मारले… आरोपींनाही फाशी द्या … नातेवाईकांची मागणी…

459

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

चोपडा : चिंचाल लालबाग ता.बऱ्हाणपूर येथील विवाहितेस तिचा पती दिनेश सुरेश जाधव व इतर ८ आरोपींनी फाशी देऊन मारले आहे अशा आशयाचा तक्रार सतीश गंगाराम गायकवाड रा.मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून लालबाग बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सतिश गंगाराम गायकवाड मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून दिनेश सुरेश जाधव, आरती सुरेश जाधव,ज्योती ईश्वर जाधव,सुरेखा गोपाल जाधव,कृष्णा गोपाल जाधव, ईश्वर दगडू जाधव,संजय सुरेश जाधव, अर्जुन गोपाल जाधव,सुरेश सखाराम जाधव सर्व रा.चिंचाल लालबाग तहसील बऱ्हाणपूर यांच्या विरुद्ध मृत्यू व हत्या अपराध प्रकरणी लालबाग पोलीस ठाणे बऱ्हाणपूर येथे तक्रार दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे फिर्यादीच्या बहिणीला नेहमी मारहाण करीत होते तसेच मानसिक छळ देखील करीत होते यापूर्वी देखील त्यांनी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारच्या वेळेस दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून घरात असलेल्या डिझेलच्या साह्याने जाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता.
तसेच यापूर्वी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी देखील त्यांनी मला व माझ्या बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
माझी बहीण ज्योती व तिच्या पती दिनेश जाधव यांच्या विवाह १८ वर्षांपूर्वी झाला होता. विवाह नंतर त्यांना दोन मुलं जन्माला आली.त्यात सतरा वर्षाची मुलगी लक्ष्मी व पंधरा वर्षाचा मुलगा दीपक या दोन मुलांचा समावेश आहे.
आरोपी क्रमांक दोन माझ्या बहिणीची सासू आहे.आरोपी क्रमांक तीन, चार व पाच माझ्या बहिणीच्या ननंद आहेत. आरोपी क्रमांक सहा माझ्या बहिणीच्या नणंदचा पती आहे. आरोपी क्रमांक सात माझ्या बहिणीचा दिर आहे.आरोपी क्रमांक आठ माझ्या बहिणीच्या भाचा आहे आरोपी क्रमांक नऊ माझ्या बहिणीच्या सासरा आहे.
यासंदर्भात याआधी देखील मी व माझ्या बहिणीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस निरीक्षक लालबाग ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक बऱ्हाणपूर येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.
पोलीस ठाण्यात या आधी दाखल केलेल्या तक्रारींच्या गांभीर्याने जर विचार करून कारवाई केली असती तर आज रोजी माझ्या बहिणीची फाशी देऊन जी हत्या करण्यात आलेली आहे ती हत्या करण्याची हिम्मत आरोपींची झाली नसती अशा प्रकारची भावना फिर्यादीने व्यक्त केली आहे.तरी पोलीस प्रशासनाने आता तरी गांभीर्याने विचार करून आरोपींना कडक शिक्षा व्हावी व त्यांना देखील फाशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली आहे.माझ्या बहिणीने फाशी लावली आहे अशा प्रकारची माहिती मला संजय सुरेश जाधव यांनी फोन करून सांगितले मी जेव्हा हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा माझी बहिण पी.एम. रूम मध्ये मला आढळून आली.
तरी सर्व आरोपींनी संगनमत करून माझ्या बहिणीच्या जीव घेतला असून सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.

Previous articleशेतकऱ्याच्या कल्याणासाठी शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन , संग्रामपूर मित्र परिवार तथा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा संग्रामपूर येथे उपक्रम
Next articleबोदवड तालुक्यांतील गोर गरीब शेतकरी यांच्या मका उध्वस्त झालेला असुन श्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसान ग्रस्ताचे पंचे नामे करून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले