Home Breaking News Ptrkar Dhamki /यावल येथे पोलीसाकडून पत्रकारास धमकी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फ पोलीस...

Ptrkar Dhamki /यावल येथे पोलीसाकडून पत्रकारास धमकी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फ पोलीस अधिक्षकांना निवेदन

215

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायत च्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन कार्यासाठी गेलेले यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांची परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनी ही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने, पत्रकार पटेल यांच्याशी विचारतांना खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे खर बोला नाहीतर साहेबांनी परवानगी दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिल्याने व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वारंवार हे प्रकार होत असल्याने कारणांने संत्पत होवुन अखेर भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्र व पत्रकारांच्या वतीने या बाबतचे निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले असुन , या निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांना माहीती देतांना म्हटले आहे की , यावल शहरातील तहसील कार्यालयात मतमोजणी च्या ठीकाणी तहसीलदार आणी पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतर ही अशा प्रकारे पोलिसांनी पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ व यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असुन. या संदर्भातील निवेदन जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक देताना भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी ,अय्युब जी पटेल, जेष्ठ पत्रकार डी, बी.पाटील, सुरेश पाटील, शेखर पटेल , भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष संघाचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, पत्रकार ललीत खरे राज्य संघटक सुनिल गावडे , उतर विभागीय उपाध्यक्ष महेश पाटील , संपर्क प्रमुख पराग सराफ , तेजस यावलकर, गोकुळ कोळी ,विकी वानखडे, दीपक नेवे, समाधान पाटील , ज्ञानेश्र्वर मराठे , मनोज नेवे यांचे सह ईतर पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना अप्पर पोलीस अधिक्षक चंदकांत गवळी यांनी सांगीतले की यावल पोलिस ठाण्यात वृतसंकलनाच्या कार्यासाठी येणाऱ्या पत्रकारांशी स्थानिक पोलिस प्रशासनाने समन्यव्याचे व सोर्हादपुर्ण संबध राखण्या बाबतची सुचना आपण देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगीतले .

 

Ptrkar Dhamki

Previous articleबोदवड तालुक्यांतील गोर गरीब शेतकरी यांच्या मका उध्वस्त झालेला असुन श्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसान ग्रस्ताचे पंचे नामे करून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले
Next articleजवाहर नवोदय विद्यालय परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ज्यूडो स्पर्धेचे उद्घाटन: