खेळामुळे शरीर सुदृढ होण्याबरोबरच मानसिक विकास साध्य होतो.त्याचबरोबर मुलींना झिरो च्या माध्यमातून स्वसंरक्षण करता येते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासावी असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
ते आंबा ता परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ज्यूडो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आपण विद्यार्थी दशेत असताना आपणास खोखो,कबड्डी,कुस्ती आदी स्पर्धांची आवड होती.यादरम्यान आपण विद्यालय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
जवाहर नवोदय विद्यालयाची इमारत जीर्ण झालेली आहे.तिचा परिसराचा विकास करणे मुला-मुलींसाठी इनडोअर हॉल बांधणे वस्तीग्रह बांधकाम डायनिंग हॉल बांधणे सुसज्य क्रीडांगण इंदोर हॉल एसी हॉल करणे यासह मैदान विकास करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची तयारी आपण केलेली असून,या प्रस्तावाचा पाठपुरावा करत निश्चितपणाने या ठिकाणचा रखडलेला विकास निर्णय झालेल्या बिल्डिंग चा प्रश्न मार्गी लागेल असाही विश्वास यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार लोणीकर विद्यार्थ्यांची समरस झाले व ते विद्यार्थी दशेत असतानाची कविता यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऐकवली विद्यार्थ्यांनीही त्यांनी सादर केलेल्या कवितेला जोरदार दात देत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की,जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी श्रम करण्याची आवश्यकता असून आपल्या भविष्यातील जिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक,डॉक्टर,इंजिनीयर, प्राध्यापक आपण सर्वजण आहात.त्यामुळे आपण सर्वांनी अभ्यासाची कास धरत स्वतःला सिद्ध करत देश विकासाला हात-भार लावावा असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
दरम्यान या स्पर्धेमध्ये छत्तीसगड, गोवा मध्य प्रदेश आदी राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या कार्यक्रमाला प्राचार्य शैलेश नागदेवते,सर्वेश भाले डॉ.प्रशांत अंभोरे,भाजपाचा अध्यक्ष रमेश भापकर,संपत टकले,दिगंबर मुजमुले,प्रशांत बोनगे,बाबा आटोळे,मस्के सर,जॉन्सन सर, सोनवणे सर,अंधारे सर,गुप्ता सर यासह शिक्षक,विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना