Home Breaking News आंतरशालेय गतका पुणे जिल्हा स्तरीय स्पर्धा – २०२२.

आंतरशालेय गतका पुणे जिल्हा स्तरीय स्पर्धा – २०२२.

452

 

पंजाब राज्यातील पारंपरिक खेळ गतका या खेळाच्या आंतरशालेय जिल्हा स्तरीय स्पर्धा गतका असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी येथे आयोजित करण्यात आल्या. गतका खेळाचा केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेमध्ये १५ शाळेतील २१० खेळाडू सहभागी झाले. यामध्ये अनुक्रमे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी प्रथम क्रमांक, जगद्गुरू इंग्लिश स्कूल देहुगाव द्वितीय क्रमांक, मातृ विद्यालय वाल्हेकर वाडी तृतीया क्रमांक पटकावला.
फरी सोटी (काठीची लढत) आणि काठी फिरवीने या खेळ प्रकारात खेळाडूंनी प्राविण्य मिळवले.
स्पर्धेचे उद्घाटन जि. एस. के. स्कूल चे संस्थापक श्री. गणेश घोगरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गतका असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. संजय बनसोडे सर, सचिव श्री. किरन अडागळे सर, मालुसरे सर हे उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रैना सर, राष्ट्रीय सैनिक संस्था पदाधिकारी श्री. प्रतापराव भोसले सर, सौ. स्मिता माने मॅडम. राष्ट्रीय हॉलीबाँल खेळाडू श्री. श्रीनिवास मुरलीधर सावंत सर यांच्या हस्ते झाले.
पंच म्हणून सुदर्शन सुर्यवंशी सर, रविराज चखाले सर, स्मिता धिवार मॅडम, अंजली बर्वे, श्रेया दांडे, रूपाली चखाले, गणेश चखाले मारीयप्पन सर यांनी कार्यभार सांभाळला.

Previous articleरोहीनीताई खडसे यांच्या संवाद यात्रेतुन सुटला निमखेड ता बोदवड येथील विद्यार्थी व गावकरयांचा मोठा प्रश्न ..
Next articleमुक्ताईनगरात राष्ट्रवादीतर्फे तानाजी सावंतच्या वक्तव्यामुळे जाहीर निषेध