Home Breaking News आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.बाबासाहेब आटोळे...

आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.बाबासाहेब आटोळे यांचे आवाहन

212

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री बिरोबा बनात अरेवाडी येथे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रविवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यास जालना जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे.
या दसरा मेळावा प्रसंगी बहुजन ह्रदय सम्राट लोकप्रिय लोकनेते आ.गोपीचंद पडळकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील बहुजनांना वंचितांना विस्थापितांना भटक्याना अन्यायग्रस्तांना शेतकऱ्यांना कामगारांना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना नोकरदारांना मेंढपाळांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याकरिता आमदार गोपीचंद पडळकर साहेब अविरत संघर्ष करत आहे. आ.पडळकर साहेबांची विचारधारा गाव गाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता या दसरा मेळाव्या प्रसंगी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा चे जालना जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार द्वारे केले आहे.
राज्यभरातील भटक्या वंचित विस्थापित बहुजन समाजातील लोकांच्या प्रश्नांवर विचारमंथन करून त्या प्रश्नांची शासनाला जाग आणून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आरेवाडी येथील बिरोबा बनात दसरा मेळावा भरवण्यास सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांत कोरोनामुळे हा दसरा मेळावा झाला नाही.यंदापासून पुन्हा हा मेळावा भरवण्याचे श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे.येत्या रविवारी हा दसरा मेळावा होणार आहे.

Previous articleमुक्ताईनगरात राष्ट्रवादीतर्फे तानाजी सावंतच्या वक्तव्यामुळे जाहीर निषेध
Next articleयावल भुसावळ या राज्य मार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था झाली असून अंजाळे घाटावर नव्याने बांधलेल्या पुलावर कठडे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे