Home Breaking News यावल भुसावळ या राज्य मार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था झाली असून अंजाळे घाटावर...

यावल भुसावळ या राज्य मार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था झाली असून अंजाळे घाटावर नव्याने बांधलेल्या पुलावर कठडे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे

506

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल ते भुसावळ जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याची पावसामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली असुन , रस्त्यावर ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन रस्त्याची , त्याचबरोबर अक्षरश : चाळण झालेली असुन, त्याच बरोबर कोटयावधी रूपये खर्च करून तयार केलेल्या अंजाळे घाटावरील सुरक्षा कठडे म्हणुन अॅन्टी क्रॉस बैरिअर बसविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले आहे की , यावल ते भुसावळ मार्गावरील यावल शहरालगत असलेल्या बालाजी सिटी या परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याकारणाने रस्त्याची तलाव सदृष्यस्थिती निर्माण होत आहे तसेच यावल ते भुसावळ या सोळा किलोमिटरच्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे . सदरचे पाणी हे वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याकारणाने पावसाचे वाहुन जाणारे पाणी हे पुर्णपणे रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवतांना तारे वरची कसरत करावी लागत आहे . वादळी पाऊस सुरू झाला की यावल आगारातुन जाणाऱ्या एसटी बसेस व ईतर वाहनांची रहद्दारी काही काळ बंद करण्यात येते , तरी या मार्गावरील रस्त्यावर ठीकठीकाणी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजुस गटारी करण्यात याव्यात , तसेच यावल ते भुसावळ दरम्यानच्या रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोर नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या प्रवाशी पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते तरी संभाव्य धोका लक्षात घेता या पुलाच्या दोन्ही बाजुस सुरक्षा कठडे ( अॅन्टी क्रॉस बेरिअर ) बांधण्यात यावीत तसेच गेल्या अनेक वर्षापासुन सदरील पुलाचे हे काम कासवगती अत्यंत कमी वेगाने होत असुन या कामाची गती वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Previous articleआरेवाडी येथील दसरा मेळाव्यास बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.बाबासाहेब आटोळे यांचे आवाहन
Next articleअट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची UAEदुबई येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धच्या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडु म्हणुन निवड