Home Breaking News जालना तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पंचनामे...

जालना तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी:

594

 

तुकाराम राठोड,सावंगी तलाव,ता.जि.जालना

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक २८/०९/२०२२ रोजी बुधवारी जालना तालुक्यातील सावंगी तलाव,उमरी,दहीफळ,पाहेगाव,साळेगाव,पारेगांव,वाडी,जैतापूर,मानेगाव,मोती गव्हाण,बाजीउमृद सह अनेक गावांमध्ये व शेतामध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे.परीसरात अचानक संध्याकाळी ७.०० वाजता वीजा सहीत मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सह हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस व तुरीचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी ५०,०००/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत द्यावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक संकटावर थोड्याफार प्रमाणात मात होईल.तसेच तात्काळ पंचनामा करावे अशी विनंती शेतकरी वर्गाकडून करण्यात येते आहे.

Previous articleअट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची UAEदुबई येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धच्या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडु म्हणुन निवड
Next articleमराठा पाटील युवक समिती शाखा पुनरगठन वरुड ता.शेगाव नामफलकाचे अनावरण