Home Breaking News बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश:

153

 

प्रतिनिधी:(मुंबई)शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज(पोहरादेवी) व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.आज पोहरादेवीची यात्रा आहे.तो मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे.असे गौरव उद्गार सुनील महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.संपूर्ण राज्यातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून,त्यांचा विकास घडविणे फक्त शिवसेनेलाच शक्य आहे,हे माझ्या लक्षात आले आहे.त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.असे यावेळी सुनील महाराज पोहरादेवी महंत म्हणाले आहे. मुंबई येथे मातोश्री येथील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमात सुनील महाराज पोहरादेवी शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Previous articleचुंचाळे फाटा ते चुंचाळे गावा पर्यंतच्या रस्त्यावरील काही भागाचे झालेले डांबरीकरण हे निकृष्ठ प्रतिचे पैसा गेला पाण्यात
Next articleजालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सोयाबीन काढण्याची लगबग सुरू: