Home Breaking News दारातच पाळत होता हात भट्टीची दारू ,गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून...

दारातच पाळत होता हात भट्टीची दारू ,गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून कारवाही करत आवळल्या मुस्क्या

256

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

बाळापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ दिनांक 2/10/2022 रोजी सकाळी दरम्यान ठाणेदार अनंतराव
वडतकार साहेब यांना गुप्त
बातमीदाराने माहिती दिली की ग्रामनिंबा येथे नारायण डाबेराव हा त्याचे राहते घराचे अंगणामध्ये अवैधरित्या गावठी हात भट्टीची दारू विनापरवाना विक्री करिता गाळत आहे अशी माहिती प्राप्त होता बीट अंमलदार यांना कार्यवाही करण्याकरिता पाठवले गावात जाऊन आरोपीचे राहते घरी पाहणी केली असता नारायण डाबेराव हा त्याचे अंगणामध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करता अवैधरित्या विनापरवाना गाळताना मिळून आला त्याचे घराची झडती घेतली असता त्याच्याजवळून पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत अंदाजे 500/- रुपये व एकूण 15 पत्राचे पिपे त्यामध्ये एकूण 150 लिटर सडवा मोहमाच किंमत अंदाजे 1500/-असा एकूण 2000/- रुपयाचा मुद्देमाल आरोपी नारायण शालिकराम डाबेराव वय 60 वर्षे रा. निंबा याचे कडून जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 65 क ड फ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष भोजने, रवी हिंगणे, महिला अंमलदार कविता बुटे यांनी कार्यवाही केली.

Previous articleमहात्मा गांधी जयंती साजरी करून गट विकास अधिकाऱ्याने स्वतः वैयक्तिक बांधकाम कामगारांना फोन करून केला पाठपुरावा ,
Next articleजालना जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार,माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश: