Home Breaking News महात्मा गांधी जयंती निमित्ताने यावल पंचायत समितीमध्ये बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी

महात्मा गांधी जयंती निमित्ताने यावल पंचायत समितीमध्ये बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी

417

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

महात्मा गांधी जयंती निमित्त गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम कामगार लाभार्थ्यांना वैयक्तिकरित्या फोन करून बोलावून आरोग्य तपासणी करण्यात आली

आज 02/10/2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पंचायत समिती यावल येथे पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री एकनाथ चौधरी यांच्या मार्गद्शनाखाली ब्लॉक मॅनेजर चेतन चौधरी (पंचायत समिती यावल ) यांनी सर्व बांधकाम कामगारांना स्वतः वयक्तिक कॉल करून ई कामगार नोंदणी/ ऑनलाईन upadte साठी कामगारांचा पाठपुरावा घेतला व महालॅब (Hindlabs) यांच्या अंतर्गत बांधकाम कामगार/ वेठ बिगारी कामगार यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली त्यात रक्त संकलन मेहराज खान यांनी केले त्यात सीबीसी, शुगर,HIV, इत्यादी तसेच बीपी ची चाचणी छाया नन्नवरे यांनी केले तपासणी केले . कॅम्प cordinator सुनील सैंदाणे यांनी ऑनलाईन update केले, त्यात सहकार्य महालॅब लॅब मॅनेजर कल्पेश महाजन, महालॅब लॅब इन्चार्ज भरत नारखेडे, आयसीटीसी समुपदेशक यावल वसंतकुमार संदानशिव , छाया नन्नवरे , चेतन धनगर (mahalab लॅब मॅनेजर जळगाव) यावल पंचायत समिती घरकुल ऑपरेटर मिलिंद कुरकुरे पंचायत समिती ऑपरेटर जावेद तडवी , रोनक तडवी ब्लॉक मॅनेजर चेतन चौधरी, परविन तायडे याच्या सहकार्य ने पार पडला.

Previous articleमनसे तर्फे पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्या PFI संस्थे विरोधात कारवाई करण्याची मागणी
Next articleजनहितार्थ रक्तदाता शोध मोहीम व जनजागृती अभियान.