Home Breaking News पोदार इंटरनेशनल स्कूल भुसावळ मध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात...

पोदार इंटरनेशनल स्कूल भुसावळ मध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा

439

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

अक्लुद तालुका यावल येथील पोदार जम्बो किड्स व पोदार इंटरनेशनल स्कूलचा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात झाला. विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले. शिक्षकांनी व विद्यार्थींनी वर्गात गांधींजींच्या जीवनशैलीवर व राहणीमानावर सुंदर देखावे बनविले होते. पालकांसाठी व विद्यार्थांसाठी आईस्क्रीमच्या काड्यांपासून चरखा बनविणे, कागदापासून लाल बहादूर शास्त्रींची टोपी बनविणे. तीन माकडचे चित्राला बोटांच्या ठसांच्या सह्याने रंगविणे, प्रश्नमंजुषा अश्या प्रकारचे विविध मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

पालक व गांधीजी, कस्तुरबाजी, लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या वेशभूशेतील विद्यार्थ्यांनी दाडी यात्रेच्या देखाव्यापर्यंत दांडी मार्च काढला. शाळेचे प्राचार्य श्री.आनंद हिरालाल शाह यांनी लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन्ही महापुर्षांचे अभिवादन केले. विद्यार्थांसाठी आयोजित केलेले विविध खेळ व देखावे हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा श्रृंगी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक श्री.रामदास कुळकर्णी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

Previous articleडुकरी-पिंपरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी:
Next articleकृषी उत्पन्न बाजार समिती व पर्यावरण संवर्धन संस्थेचा संयुक्त उपक्रम.