Home जालना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे ह्यांचा विकासकामांचा धडाका सुरू:

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे ह्यांचा विकासकामांचा धडाका सुरू:

249

 

(तुकाराम राठोड,जालना)

प्रतिनिधी:(जालना)रावसाहेब दानवे ह्यांनी रेल्वे पदभार स्वीकारल्यापासून त्यांची विकासाची रेल्वे देशात आणि खासकरून मराठवाड्यात सुसाट धावत आहे.मागील काही महिन्यात मनमाड-मुदखेड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण,जालना-जळगाव सर्वेक्षण,जालना अंतर्गत पाणीपुरवठा करिता 129 करोड च निधी,जालना रेल्वे स्टेशन १५० कोटींची श्री राजुरेश्वर मंदिराचा लूक असणारी भव्य इमारत,पिट लाईन,लॉजिस्टिक पार्क,ICT कॉलेज करीत ५५ करोड चा निधी असा त्यांनी लावलेला कामाचा धडाका आवाक करणारा आहे.खासकरून जालनेकरांना हा सुखद आणि तितकाच आश्चर्यकारक अनुभव आहे.जालना रेल्वे स्थानकांच्या मोठ्या अपग्रेडेशनची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेत रेल्वे स्टेशन रूफ प्लाझा/कॉन्कोर्सची तरतूद समाविष्ट आहे.जेथे प्रवासी आणि इतर वापरकर्ते आरामात थांबू शकतील आणि आरामगृह,करमणूक क्षेत्र,प्रतीक्षालय,आसनव्यवस्था,शॉपिंग क्षेत्र रेस्टॉरंट/यासारख्या उत्कृष्ट आणि सुव्यवस्थित सुविधांचा आनंद घेऊ शकतील.कॅफेटेरिया,टॅप केलेले शुद्ध पिण्याचे पाणी पॉइंट्स,प्रसाधनगृहे,वायफाय,एटीएम,वैद्यकीय सुविधा इ.सुविधा ही त्यात अंतर्भूत असतील.काही दिवसांपूर्वीच मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्प करार झाला.ह्या लॉजिस्टिक्स पार्कमध्ये कच्चा माल भाजीपाला साठवून शीतगृहे,मोठी गोदामे उपलब्ध करून देण्यात असून त्या सोबतीला आधुनिक electrified रेल्वे कनेक्टिव्हिटी व समृद्धी महामार्ग सारखी कार्यक्षम रस्ते कनेक्टि्हिटी ची जोड देण्यात दानवे साहेब कोणतीही कसर मागे ठेवली नाही.आज झालेल्या पिट लाईन सेवेची पायाभरणी झाली.भविष्यातील अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ह्या पीटलाइनवर एक्स्प्रेस रेल्वे थांबल्यानंतर रेल्वे तंत्रज्ञ ट्रॅकखाली जाऊन इंजिन तसेच डब्यांची पाहणी करू शकतात.काही बिघाड असेल तर त्याची दुरुस्ती करणे सहज शक्य होते.शिवाय पीटलाइनवर डबे धुणे तसेच स्वच्छतेची खास यंत्रणा असते.त्याशिवाय शेवटचा थांबा असणाऱ्या ह्या पिट लाईन युक्त स्थानक पासून नवीन रेल्वे जालना – गोरखपूर सुरू करण्यास सहज होईल अन् त्याचा फायदा जालना MIDC मध्ये काम करणाऱ्या उत्तर भारतीय मजुरांना होणार आहे.ह्या पीट लाईन मूळे जालना जिल्ह्याचा संपर्क राज्यातील इतर जिल्ह्यांशी वाढणार आणि पर्यायाने विकासाच्या कक्षा रुंदावणार,
विविध रोजगार उपलब्ध होतील,अन् पर्यायाने जालना सोन्याचा पाळणा ही उक्ती शब्दशःजिल्ह्याला लागू होईल.ही अपेक्षा सामान्य जलनेकर बाळगून आहे.ना.केंद्रीयमंत्री दानवे साहेबांनी विकासाची गंगा आपल्या भागीरथी प्रयत्नातून जालन्यात आणण्याची पराकाष्ठा सामान्य जालनेकर अनुभवत आहे एव्हढे मात्र नक्की.

Previous articleमहाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या मागणी संदर्भात यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन उपोषण संपन्न
Next articleभाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचा सत्कार: