Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील रोजगार सेवकांची तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

संग्रामपूर तालुक्यातील रोजगार सेवकांची तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

360

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

दिनांक 06/10/2022 ते 08/10/2022 प्रशिक्षण आयोजित केले सदर प्रशिक्षणामध्ये रोजगार हमी मध्ये असणारी काम यावर सविस्तर माहिती देण्यात आली
तसेच पंचायत समिती मधून विविध असणाऱ्या योजना बद्दल माहिती देऊन गोरगरिबांपर्यंत योजना पोहोचवा असे आदेश माननीय गटविकास अधिकारी संजय पाटील साहेब यांनी दिले प्रत्येक गावातील गरजू लाभार्थी हा वंचित राहणार नाही व त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व रोजगार सेवक यांनी काम करणे गरजेचे आहे असे संजय पाटील यांनी सांगितले
सदर शिबिरामध्ये एक दिवस बोडखा या गावात जाऊन काम कसे करायचे आणि नियोजन कसे करायचे याबद्दल ट्रेनिंग देण्यात आले त्याचप्रमाणे प्रत्येक गावात काम झाली पाहिजे असे सांगण्यात आले अशी माहिती रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मेटांगे यांनी दिली सदर प्रशिक्षणासाठी अवकाळे साहेब व खोडके साहेब यांनी प्रशिक्षण दिले
कार्यक्रमाचे उद्घाटन व समारोप माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी भिलावेकर साहेब यांनी केला सदर प्रशिक्षणासाठी सुरडकर मॅडम मोरे साहेब परिहार साहेब मुळे साहेब इंगळे साहेब त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला

Previous articleहिंगणघाट शहरात शासन व प्रशासन यांची अतिक्रमण बाबत दुटप्पी भूमिका
Next articleविकासाच्या प्रश्नावर आपण राजकारण करत नाही,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन.