Home वर्धा शिरतुन्नबी कमेटीचे वतीने ईदमिलादुनबी साजरी

शिरतुन्नबी कमेटीचे वतीने ईदमिलादुनबी साजरी

179

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

. हिंगणघाट दि.१०/
जश्ने ईद मिलादुन्नबी मर्कजी शिरतुन्नबी कमिटीचेवतीने नातंखानी, तकरीर तसेच बालकांचा दिनी मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले.
शहरात मुस्लिम बांधवांकडुन शहरातिल निशानपुरा ,गौतम वार्ड, पिली मस्जिद, सुभानिया मस्जिद , टाॅका मस्जिद, येथून जुलूस काढत रुबा चौक येथे एकत्र झाले.
स्थानिक रुबा चौक येथून शांतता पाळत सद्भावना तसेच बंधुभाव कायम ठेवीत शहराच्या प्रमुख मार्गाने जुलूस काढण्यात आला,या दरम्यान कारंजा चौक तसेच विठोबा चौक येथे मिठाई व आलू पोहा वितरित करण्यात आला.
यात रब्बानी स्पोर्टिंग क्लब तसेच गुलामाने मदिना कमिटी व इतर समाजसेवी युवकांच्या वतीने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरात मुस्लिमबांधवांच्या प्रत्येक प्रभागात सजावटिचे आयोजन करण्यात आले होते .
या सजावटीला प्रतिसाद देऊन किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टिंग क्लब तर्फे प्रथम क्रमांक
निशाणपुरा R.B.N गृप,द्वितीय क्रमांक कादरी ग्रुप तर तृतीय क्रमांक अंजुमन गुलशन रजा कमिटी स्टेशनफैल,चतुर्थ क्रमांक मदनी ग्रुप चोखोबा वार्ड, पांचवा क्रमांक पाकीजा ग्रुप नन्नाशा वार्ड, याॅ ख्वाजा गरीब नवाज ग्रुप चोखोबा वार्ड यांना शील्ड देण्यात आले.
निशाणपुरा, जामा मस्जिद, नन्नाशा वार्ड, सुभानीया मस्जिद, विठोबा चौक येथे ठिकठिकाणी लंगरचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले,पोलिस विभागाने सहकार्य केल्याबद्दल मर्कजी शिरतुन्नबी कमिटी हाजी तौसीफ, अब्रारभाई, मुबारक मलनस, मोबीन भाई, युनुस कुरेशी, शेख इम्रान, ताजू भाई , अज्जू मिर्झा,
अझहरभाई, आसिफ भाई, माहीन शेख, शेख इर्शाद इत्यादिच्यावतीने पोलिस प्रशासनाप्रती आभार व्यक्त करण्यात आले.
ईद मिलादुन्नबीच्या पर्वावर आयोजित जुलूससोबत मागे असलेल्या युवकांचेवतीने रस्त्यावर झालेल्या केरकचऱ्याचे निर्मूलन करीत शहरातील नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला,सदर स्वच्छता मोहिमेचे आयोजन मरहबा गृपचेवतीने
करण्यात आले.

Previous articleशेतकऱ्यांना तात्काळ न्याय देऊन मागण्या मान्य करा,मनसेने केले रामनगर येथे रस्ता रोको आंदोलन,शासनाला दिला इशारा:
Next articleबोरगाव वैराळे येथे कोजागिरी निमित्त व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ! बोरगाव वैराळे