Home बुलढाणा संत नगरी शेगाव येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज...

संत नगरी शेगाव येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

455

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

शेगाव (प्रतिनिधी ) जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळया चे आयोजन शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम. एस. ई. सी. बी. चौक खामगाव रोड, संत नगरी शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मोफत रुग्णवाहिका सेवा – महाराष्ट्रात विविध महामार्गावर 37 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, ब्लड इन नीड, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व सर्व सेवाकेंद्र सदस्य, आरती केंद्र सदस्य व भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. १५ व १६ ऑक्टोंबर रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी संत नगरी शेगाव येथे उपस्थित रहावे. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तरी या महन्मंगल समयी सर्व भाविकांनी उपस्थित राहून परम पूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख, पीठ व्यवस्थापक, पिठ समिती सदस्य, जिल्हा निरीक्षक व जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

Previous articleमॅरेथॉन स्पर्धेत भिंगारा शाळेतील विद्यार्थ्यांचा दबदबा……यशाची परंपरा कायम.
Next articleरोटरी क्लब कडून संजय गांधी विद्यालय (परडा ) ला सिलिंग फॅन भेट