Home Breaking News जालना महापालिकेसाठी हिंदू महासभेचे “जागर महापालिके”चा लक्षवेधी आंदोलन!- हिंदू महासभेच्या आंदोलनामुळे काहींच्या...

जालना महापालिकेसाठी हिंदू महासभेचे “जागर महापालिके”चा लक्षवेधी आंदोलन!- हिंदू महासभेच्या आंदोलनामुळे काहींच्या पोटात पोटशुळ उठले- माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर.

420

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)महानगरपालिका निर्माण करून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने “जागर महापालिकेचा” लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने शहरातील वीर सावरकर चौक येथे(दि.11 ऑक्टोंबर 2022)रोजी प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक वाद्यासह जागर महापालिकेचा हे लक्षवेधी आंदोलन केले.याप्रसंगी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आंदोलकास आश्वासन दिले की,जालना नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यासाठी स्वतःप्रयत्नशील असून,लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हिंदू महासभेचे निवेदन सुपूर्द करून त्यांचे या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधनार असल्याचे सांगितले.

तर माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सोबत चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ जालना शहरातील नागरिकांच्या समस्या निराकरण करणे व विविध बाबतीत नगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे जालना महापालिकेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आनुन देणार असल्याचे सांगीतले.यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने,भाजपाचे नेता सिद्धिविनायक मुळे व वीरेंद्र प्रकाश धोका यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी यांच्या लक्षवेधी आंदोलनाचे कौतुक करुन जाहिर पाठिंबा दिला.

या प्रसंगी श्री सुर्यवंशी म्हणाले की,जालना नगर परिषदेला महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी हिंदू महासभेचा संघर्ष सुरूच राहील.लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जालना नगरपालिकेला महानगर पालिका दर्जा देने का आवश्यक आहे.याचे सविस्तर मुद्यांसह भुमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगीतले.सदरिल आंदोलनास लहुजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन शिरसागर,मराठा महासंघाचे अशोक पडुळ,जय भीम क्रांती सेनेचे दीपक बोर्डे यांनी पाठिंबा दिला.

आंदोलकांमध्ये सर्वश्री ईश्वर बिल्होरे,कालुसिंह राजपूत,तुकाराम मिसाळ,रमेश सातपुते,सुखलालसिंह राजपूत,विनोद आठवे,नारायण त्रिंबके,शिवप्रसाद राठी,देवीसिंग वर्मा,किशोर माधोवाले,राजुसिंग राजपूत,किशोर राजपूत,देवचंद सावरे,मगनसिंग राजपूत,नरेंद्र वलेचा,नरेश राजपूत,अशोक भगुरे,रामधन राजपूत,किशोर राजपूत,पवन राजपूत,आदित्य राजपूत,मदन खाकीवाले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदू महासभेने जालना महानगरपालिका व्हावे हे आंदोलन सुरू केले मात्र हे मागणी मी यापूर्वी केली आहे. काही लोकांना कळत नाही स्वतःचा मलिदा वाचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.जिल्हाधिकारी कमिशनर यांनी हा प्रस्ताव पुढे नेला पाहिजे.ठराविक लोकसंख्या झाल्यावर महानगरपालिका प्राप्त होते.काही लोक सांगतात कर वगैरे वाढेल असं काही नाही.आय एस दर्जाचा अधिकारी येईल.जालना नगरपालिका भ्रष्टाचार पूर्ण झालेला आहे.यासाठी जालना महानगरपालिका झाली पाहिजे.असा आरोप माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे.

तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे असताना जालना महानगरपालिकेची घोषणा केली होती.मात्र अद्यापही अमलात आली नाही.जालना महानगरपालक व्हावी यापूर्वी देखील मागणी केली होती.मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन जालना महानगरपालिका साठी प्रयत्न करू असे आश्वासन भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी बोलताना सांगितले आहे.

Previous articleरोटरी क्लब कडून संजय गांधी विद्यालय (परडा ) ला सिलिंग फॅन भेट
Next articleजालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली शिवारातील कपाशी पिक व सोयाबीन जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांची मागणी