Home Breaking News जालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली शिवारातील कपाशी पिक व सोयाबीन जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची...

जालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली शिवारातील कपाशी पिक व सोयाबीन जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांची मागणी

313

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक ११/१०/२०२२ रोजी जालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात कपाशी,सोयाबीन आणि तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मौजे बाजीउम्रद,पारेगांव,जैतापूर, दहिफळ,सावंगी तलाव व अनेक गावांमध्ये व परीसरात अचानक दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत वीजा सहीत मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.काढणीला आलेल्या सोयाबीन,कापूस व तुरीचे तसेच नेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.व कपाशी जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर थोड्याफार प्रमाणात मदत होईल.अशी मागणी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Previous articleजालना महापालिकेसाठी हिंदू महासभेचे “जागर महापालिके”चा लक्षवेधी आंदोलन!- हिंदू महासभेच्या आंदोलनामुळे काहींच्या पोटात पोटशुळ उठले- माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर.
Next articleसंभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने विजयादशमी निमित्त स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न: