Home Breaking News न्यायालयाचा अपमान डॉक्टरांनी दिली खोटी माहिती

न्यायालयाचा अपमान डॉक्टरांनी दिली खोटी माहिती

606

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- शहरातील नामवंत डॉ. प्रकाश लाहोटी यांचे हिंगणघाट शहरातील महेश ज्ञानपीठ यांच्या ताब्यावरून धर्मदाय आयुक्त येथे प्रकरण चालू आहे. दि.6 ऑक्टोंबर ला संबंधित प्रकरणाची तारीख होती यावेळेस डॉक्टर प्रकाश लाहोटी गैरहजर होते त्यांनी गैरहजर राहण्याचे कारण दिले . त्यासाठी डॉ. मुखी यांनी डॉ. प्रकाश लाहोटी यांना सर्दी ,खोकला ,ताप असल्यामुळे त्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे व आराम करण्यास सांगितले होते. त्या आधारावर पुढील तारीख देण्यात आली. प्रत्यक्षात डॉक्टरनी न्यायालयाला दिलेले माहिती ही खोटी आहे याबाबत पुरावा आहे. त्याच तारखेला डॉ. प्रकाश लाहोटी यांचा दवाखाना सुरू होता व त्यांनी पेशंट तपासले म्हणजे त्यांनी त्यांचा व्यवसाय केला. न्यायालयाला खोटी माहिती देणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. आज डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडल्यास न्यायालयामध्ये खऱ्याचा खोटं व खोट्याचं खरं सुद्धा करता येते , काही डॉक्टर याच्या आड मध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन व्यवसाय करतात

Previous articleजालना तालुक्यातील मौजपुरी सर्कल सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान:
Next articleशिक्षकपर्व उपक्रम अंतर्गत कार्य प्रेरणा शिबिर