Home Breaking News वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू:

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू:

516

 

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यामध्ये मागिल काही दिवसांपासून रिमझिम व मुसळधार पाऊस तसेच चक्रीवादळ सदृश परिस्थिती आणि विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे,त्यामुळे वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत च आहे.अशीच घटना दिनांक 14,10,2022 रोजी घडली.घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला असल्याची घटना बारा वाजेच्या सुमारास घडली,सरफगव्हाण येथील शेतकरी तुकाराम काळे हे नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना,अचानक त्यांच्यावर वीज कोसळली,त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला,यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Previous articleमानोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा स्थापना
Next articleगट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथे जागतिक अंडा दिन साजरा