Home Breaking News जालना तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर:

जालना तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर:

252

 

(तुकाराम राठोड,जालना)

प्रतिनिधी:(जालना)दिनांक -14/10/2022 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-जालना यांच्या वतीने जालना तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांची तात्काळ नुकसान भरपाई व पीक विमा शेतकऱ्यांना देणे बाबतचे निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना मा.श्री.रविंद्रजी तौर साहेब-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य तथा पक्षनिरीक्षक बुलढाणा जिल्हा,श्री.दिलीपराव भुतेकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना,जगन्नाथ काकडे,दिनकर बापू भुतेकर,भारत कदम-युवा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भगवान नाईकनवरे,रामेश्वर भुतेकर,गणेश लोखंडे,तात्यासाहेब सराटे,सतिष गव्हाळे,गजानन शिंदे,रावसाहेब मोहिते,संतोष भुतेकर,देवराव गायकवाड,अमोल जाधव,कदीर सय्यद ,गणेश कदम,मनोज देशमुख,भगवान कदम,भगवान अनपढ,गजानन भांडवले,शिवाजी राव भुतेकर,मुक्ताराम सराटे,आरेकर तात्या,शरद पो्हेकर,भाऊसाहेब शिंगाडे,शिवाजी लिखे,सुरेश कदम,ज्ञानेश्वर सराटे,दत्ता भुतेकर,नारायण कोकरे,देविदास बोंबले,गणेश बर्वे,कैलास नागवे,सुशील पिसोरे,राजेभाऊ उजेड,अनारस म्हस्के,बाळू कुटे,उमेश फासाटे,गजानन शिंदे,सुंदर नागवे,कैलास नागवे,निलेश भुतेकर,प्रवीण कवठे तसेच जालना तालुक्यातील अनेक कार्यकर्ते,शेतकरी बांधव निवेदन देताना उपस्थित होते.तर या निवेदनात-गेल्या सहा महिन्यापासून राज्याच्या विविध भागात विशेत जालना तालुक्यात चालू वर्षात २०२२ सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतातील उभे पिकांची अक्षरक्ष माती झालेली आहे.सोयाबीन,तूर,भात , कापूस,मोसंबी फळबागा,अंगूर इत्यादी पिकांची अतिरिक्त पावसामुळे ती सडुन गेली आहे.शासनस्तरावर अजून कुठलाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान,पिकविमा देण्यात आलेला नाही.जालना तालुक्यातील रामनगर,सेवली,नेर,विरेगांव,भाटेपुरी,पाचनवडगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पिके १०० टक्के नासाडी झालेली आहे.या संदर्भातील जाचक अटी रद्द करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी.नसता आम्ही रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारू या निवेदनाद्वारे स्पष्ट सांगितले.

Previous articleजालना तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात:
Next articleभारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर याची निवड: