Home Breaking News भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर याची निवड:

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर याची निवड:

194

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करत असले बाबतची घोषणा केली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री बावनकुळे म्हणाले की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आणि सजग असला पाहिजे.तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम पोहोचविण्यासाठी त्याने प्रयत्नशील असावे.युवा वॉरिअरच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील तरुणांना भारतीय जनता पार्टी कडे आकर्षित करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन युवा वॉरिअरच्या शाखा उघडण्याबाबत भर द्यावा त्याचप्रमाणे मोदीजींच्या योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

युवा वॉरियर्स ही १८ ते २५ वयोगटातील तरुणांची एक निपक्ष पातळीवर काम करणारी फळी असून त्या युवकांना भारतीय जनता पार्टीचे कार्य समजावून सांगत नवयुवकांची मोठी फळी उभारणार असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची पार्टी असून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पक्षात न्याय मिळतो अशा भावना भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील पक्ष नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात मला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळाली असून मी नक्कीच तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करेल त्याचबरोबर केंद्रीय आणि राज्यातील पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वासने सार्थ ठरवेल अशी प्रतिक्रिया देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी दिली.

युवा वॉरियर च्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील १८ ते २५ वयोगटातील युवकांची मोठी फळी भारतीय जनता पार्टी च्या बाजूने उभारली जाणार असून त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार असून ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे त्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन मोदीजींचे आभार व्यक्त करणारे ५० लाखापेक्षा अधिक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.

Previous articleजालना तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर:
Next articleभारतीय खाद्य महामंडळ निगमच्या राज्य सदस्यपदी कपिल दहेकर यांची निवड: