Home Breaking News भारतीय खाद्य महामंडळ निगमच्या राज्य सदस्यपदी कपिल दहेकर यांची निवड:

भारतीय खाद्य महामंडळ निगमच्या राज्य सदस्यपदी कपिल दहेकर यांची निवड:

218

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना भारतीय खाद्य महामंडळ निगमच्या राज्यसदस्यपदी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दहेकर यांचे स्वागत केले.केंद्र शासनाकडून राज्य स्तरावर भारतीय खाद्य महामंडळ निगम समिती स्थापन करण्यात आली.कपिल दहेकर यांनी धनगर समाज तथा ओबीसी समाजाचे प्रश्न जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर सोडवण्यासाठी चांगले प्रयत्न केले .जनसामान्याच्या हक्कासाठी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले.ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा लढा असेल,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वसतिगृहाच्या बाबतीत प्रश्न असेल,असे उल्लेखनीय कार्य पाहून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय खाद्य महामंडळ (निगम)महाराष्ट्र राज्य सदस्य पदी त्यांची निवड केली.या निवडीबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे,केंद्रीय मंत्री पियुष गोयल,आ.संतोष दानवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर,शहरध्यक्ष राजेश राऊत,अतिक खान आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर याची निवड:
Next articleराहुलभैय्या लोणीकर यांच्या निवडीने मराठवाड्यात नवचैतन्य निर्माण झाले,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सेवली येथे व्यक्त केले गौरवोद्गार