Home Breaking News दिवाळीनंतर शासनाची किट मिळणार काय?

दिवाळीनंतर शासनाची किट मिळणार काय?

198

 

@ गोर गरीब जनतेचा सरकारला प्रश्र

शासनाने मोठा गाजावाजा करीत गोरगरीब जनतेला दिवाळीला १०० रुपयात धान्याची किट देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळी ४ ते ५ दिवसांवर येऊन ठेपली असतांना अद्यापही स्वस्त धान्य दुकानातून धान्याची किट वितरीत केली जात नसल्याने शासन दिवाळीनंतर किट देणार काय ? असा प्रश्न गोरगरीब जनता उपस्थित करीत आहे

शासनाने वृत्तपत्रे आणि टि व्ही चॅनल्सद्वारे, मोठा गाजावाजा करीत दिवाळी निमित्त, एक किलो रवा, एक किलो चना दाळ, एक किलो साखर आणि एक किलो पामतेल या वस्तु शंभर रुपयात देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळी अवघ्या चार ते पाच दिवसावर येऊन ठेपली असतांना अध्यापही स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीबांची व निराधारांची दिवाळी गोड करण्याकरीता जाहिर केलेली किट वाटप केली जात नसल्याने, सदर किट दिवाळी झाल्यावर मिळणार की काय? अश्या प्रश्नाचा भाडीमार जनता करीत असल्याचे दिसत आहे. तसेच दरमहा मिळणारे नियमित धान्य आणि प्रधानमंत्री गरीब अन्य योजने अंतर्गत मिळणारे मोफत धान्य यांचेही वाटप चालू झाले नसल्याने. त्यामुळे हे धान्य सुद्धा दिवाळी झाल्यावर मिळणार की काय? असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.

Previous articleजंगली रानडुकराच्या हमल्यात महिलेचा मृत्यू
Next articleवाढदिवसाला सामाजिक कार्यकर्ता अरविंद झाडे याचे निधन