Home Breaking News तहसीलदार राजू गणवीर स्टॅम्प विक्रेत्यावर कारवाई का करत नाही ?

तहसीलदार राजू गणवीर स्टॅम्प विक्रेत्यावर कारवाई का करत नाही ?

476

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

समुद्रपूर :- तहसील आवारात व बाहेर 100 रुपयाचा स्टॅम्प 110 रुपये मध्ये विकण्यात येते याबद्दल तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रार केल्यावर सुद्धा कारवाई होत नाही ? तहसीलदार आमचे काहीही करू शकत नाही स्टॅम्प विक्रेते सांगतात . समुद्रपूर येथे 100 रुपयांच्या स्टॅम्प 110 रुपयात विकण्यात येते याबद्दल मीडियाच्या माध्यमातून माहिती वरिष्ठांपर्यंत गेली असताना सुद्धा समुद्रपूर येथे कोणतीही कारवाई होताना दिसत नाही ? समुद्रपूरचे तहसीलदार राजू रणवीर यांना याबद्दल पूर्ण माहिती असताना सुद्धा , त्यांच्याकडे या विषयावर चर्चा केली असता सांगतात की ते काम आमचं नाही ? शेवटी तहसील समुद्रपूर प्रमुख म्हणून तहसीलदार यांच्याकडून जनतेच्या काही अपेक्षा आहे .100 रुपयाचा स्टॅम्प ११० मध्ये स्टॅम्प विक्रेते विकत आहे. होणारी जनतेची लूट यामध्ये तहसीलदार यांनी हस्तक्षेप करावा अशी जनतेची इच्छा असते परंतु तहसीलदार राजू गणवीर यांच्याकडून कोणतीही कारवाई नाही . जनतेची होणारी लूट केव्हा थांबणार समुद्रपूर येथील प्रशासन यांच्याकडून होणारे दुर्लक्ष जनतेच्या मनात शंका निर्माण करीत आहे. या मागे अर्थकारण तर नाही ? तहसीलदार यांच्याकडे भूमि अभिलेख संबंधित तक्रार केल्या वर सुद्धा कारवाई होत नाही ? तक्रारदार यांचे समाधान होत नाही अशी माहिती समोर आली आहे .

Previous articleशेतकरी लाभार्थ्याचे शासकीय अनुदान बँक व्यवस्थापकांनी कर्ज खात्यामध्ये कपात करू नये तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी,भारतीय जनता पार्टी च्या वतीने तहसीलदारांकडे मागणी:
Next articleनगर पालिका प्रशासन कडून प्लास्टिक बंदी विरोधात धडक कार्यवाही.