Home Breaking News यावल नगर परिषदच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे शहरात मोकाट जनावरांचा गोंधळ दोन...

यावल नगर परिषदच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे शहरात मोकाट जनावरांचा गोंधळ दोन जणांचा गेला जिव

382

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शहरातील प्रमुख मार्गावर मोकाट गुर , डुकर आणी कुत्र्यांचा वावर वाढल्याने पादचारी व मोटर वाहनांना प्रचंड त्रास सोसावा लागत असुन , प्रसंगी गुरढोर व मोकाट जनावरे हे वाहनात घुसत असल्याने अपघात होवुन शहरात दोन जणांनी आपला जिव गमावला असुन तरी देखील यावल नगर परिषद प्रशासना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची नागरीकांची तक्रार आहे. यावल शहरात मागील अनेक दिवसापासुन नगर परिषदच्या अक्षम्यः दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील प्रमुख मार्गा पासुन तर विस्तारीत वसाहती मधील मार्गा पर्यंत सर्वत्र फिरतांना दिसुन येत असुन , यावल स्टेट बँक समोरील मार्गावर अशाच प्रकारे मोकाट फिरणारे जनावर वाहनात घुसल्याने काल शनिवार दिनांक १५ रोजी शिरपुर तालुक्यातील अशोक चव्हाण वय७० वर्षाच्या वयोवृद्ध व्याक्तीचा जिव गेल्याची घटना घडली असुन, या आदी शहरातील महाजन गल्ली परिसरात मागील एक महीन्या पुर्वीच नथ्यु बारी या मजुर व्यक्तिला मोकाट गुराने धडक दिल्याने बारी वाडयातील राहणारे बारी यांना गंभीर दुखापत होवुंन ते गृहस्थ उपचारा दरम्यान मरण पावले होते . यावल नगर परिषद कडे मोकाट गुरेढोर, मोकाट कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागणी वारंवार नागरीकांनी केली असतांना नगर परिषद प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याने शहरवासीयांमध्ये प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . तरी नगर परिषद पुन्हा या मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा व पुनश्न या जनावरांमुळे तिसरा निरपराध व्याक्तीचा बळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा नागरीकांकड्डन व्यक्त करण्यात येत आहे .

Previous articleनगर पालिका प्रशासन कडून प्लास्टिक बंदी विरोधात धडक कार्यवाही.
Next articleभुलाबाईच्या गाण्यांच्या स्पर्धाचे आयोजन जल्लोषात !