Home Breaking News भुलाबाईच्या गाण्यांच्या स्पर्धाचे आयोजन जल्लोषात !

भुलाबाईच्या गाण्यांच्या स्पर्धाचे आयोजन जल्लोषात !

354

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरोघरी मुली व स्त्रिया भुलाबाईचे खेळ खेळून पारंपारिक गाणी म्हणत असतात. आधुनिक काळात या कला नष्ट होत चालल्या आहे. नव्या पिढीला त्याची जाण व्हावी आणि या सण, परंपरा व कला पुढेही जोपासल्या जाव्यात या अनुषंगाने समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन एल एल पी द्वारा आयोजित भुलाबाईच्या गाण्यांची भव्य स्पर्धा १६ ऑक्टोबर २०२२, रविवारी रोजी नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय टाका ग्राउंड हिंगणघाट येथे उत्साहात पार पडली.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पी व्ही टेक्स्टाईल जामचे प्रबंधक श्री भूपेंद्रजी शहाणे, सौ. विनया शहाणे , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अतुल वांदिले, मातोश्री महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, माजी नगरसेविका सौ शुभांगी डोंगरे, माजी नगरसेवक श्री मनीष देवडे, श्रीमती शकुंतला दुधलकर, सर्पमित्र श्री प्रवीण कडू, जेष्ठ पत्रकार श्री सतीश वखरे, समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन चे संचालक सौ श्रृती दुधलकर सोरटे व श्री राहुल सोरटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भुलाबाईचे पारंपरिक रित्या पूजन करून करण्यात आली. प्रसंगी कु.दीक्षा मून हिने स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाला परीक्षक म्हणून संगीत शिक्षक श्री विजय गावंडे व सेवानिवृत्त प्रा. सौ. सुरेखा देशमुख हे उपस्थित होते.

या स्पर्धेत सर्व वयोगटातील मुली व स्त्रियांच्या एकूण १२ समूहांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वेगवेगळी पारंपरिक भुलाबाईची गीत तसेच काही नव्याने लिहिलेली आधुनिक भुलाबाईंच्या गाण्यांचे सादरीकरण व विविध पारंपारिक खेळ स्पर्धकांनी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ₹ ३००१/- शिवकन्या ग्रुप यांनी प्राप्त केले द्वितीय पारितोषिक ₹ २००१/- जय मातादी महिला मंडळ यांना मिळाले.
तृतीय पारितोषिक ₹ १००१/- श्री स्वामी समर्थ ग्रुप यांना देण्यात आले.
प्रोत्साहनपर पुरस्कार ₹ ५०१/- सोनामाता महिला मंडळ
तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार ₹ २०१/- व भेट वस्तू विद्या विकास जुनियर कॉलेज हिंगणघाट या ग्रुपला देऊन विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.

या प्रसंगी सौ. निशा तिनगसे, सौ.अर्चना झालटे, सौ. भाग्यश्री साबळे, सौ. वैशाली तडस, श्री प्रवीण कडू व श्री सतीश वखरे यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बी विथ मी चे संचालक श्री पितांबर चंदानी, विद्या विकास कॉलेज समुद्रपूरच्या उपप्राचार्य सौ. नयना शिरभाते, स्नेहल किसान नर्सरीच्या सौ. विद्या खांडरे व सौ. रितू खांडरे, श्रीमती शकुंतला दुधलकर तसेच स्पर्धेचे परीक्षक श्री विजय गावंडे व सौ सुरेखा देशमुख यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. वैशाली तडस येळणे तर प्रास्ताविक सौ. श्रृती दुधलकर सोरटे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन व प्रबंधन कार्यक्रमाच्या समन्वयक कु. वृषाली तळवेकर, कु. महिमा खापरकर, कु. दीक्षा मून व कु. मयुरी गौळकार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मनोज दुधलकर,
कु. तानिया वाधवानी, कु.उत्कर्षा कडवे, कु. दिव्या हुलके, कु. मेघा तळवेकर, कु.स्वाती बेहेरे, कु. ईशा लोणकर, कु. नेहा बांदुरकर व समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन च्या संपूर्ण टीमचा हातभार लाभला.

Previous articleयावल नगर परिषदच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे शहरात मोकाट जनावरांचा गोंधळ दोन जणांचा गेला जिव
Next articleहिंगणघाट विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती