Home Breaking News हिंगणघाट विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती

हिंगणघाट विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती

216

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते,जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्या चौहान यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौ.ज्योतीताई देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त गजबे यांनी रा.कॉ.पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचेवर श्रद्धा ठेवत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व महिला जिल्हाध्यक्ष सौ.ज्योतिताई देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षसंघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,नागपूर जिल्हा निरीक्षक सौ.सुरेखाताई देशमुख,ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे, जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे,विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleभुलाबाईच्या गाण्यांच्या स्पर्धाचे आयोजन जल्लोषात !
Next article२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे