Home वर्धा जन्मदिवसाच्या निमित्ताने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर

जन्मदिवसाच्या निमित्ताने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर

123

 

 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे रुग्णसेवक श्री सूरज दादाजी कुबडे व धीरज देवनाथ नंदरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने दि 19 आक्टोबरला संतोषी माता मंदिराच्या सभागृहात भव्य बिपि शुगर व रक्त तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा संगीता श्रीकांत बढे (वर्धा )होत्या,.प्रमुख अतिथी पत्रकार सतीश वखरे, रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे,पतंजलीचे वसंतराव पाल गुरुजी,वृक्षप्रेमी गोपाल मांडवकर,डॉ भूषण वासाडे, मंदिर सदस्य शिवाजीराव जाधव प्रहारचे शहर अध्यक्ष अतुल जाधव,अजय खेडेकर उपसरपंच जाम ग्रा. पं., राहुल पाटील सदस्य जाम ग्रा. पं.,प्रहारचे अजय लढी, सतीश गलांडे,रवी धोटे निवृत्त जवान श्रीकांत फलके,हे उपस्थित होते.
यावेळी कोरोनाच्या काळात उत्तम आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या हिंगणघाट शहरातील 46 आशावर्कर यांचा त्याच्या सेवा कार्याची दखल घेऊन गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आशा वर्कर उज्ज्वला झुंझूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात 122 स्त्री-पुरुष रुग्णांची तपासणी करून नोंदणी करण्यात आली.ही आरोग्य विषयक तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र टाका ग्राउंड ,हिंगणघाटचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतीक डांगरे व सहकारी दीक्षा बोधनकर,प्रिया लोहकरे,अरुणा सुरडकर व चमुने उत्तम प्रकारे केली.
यावेळी सत्कार मूर्ती रुग्णसेवक सूरज कुबडे व धीरज नंदरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रसमुहाने सामाजिक भान जोपासून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत पवन वाघमारे,अमोल रामगुंडे,अमित गोहणे,हर्षल बोबडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल वाघमारे यांनी केले.संचालन निर्दोष भांदककर यांनी व आभार चेतन डफ यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री विठ्ठलराव कुबडे, सुभाषराव बोरघरे, राजूभाऊ ठाकरे,देवाजी कुबडे,गीता देवनाथ नंदरे, सुमन दादाजी कुबडे आशुताई चरडे,अमोल वाघमारे,अजय ठाकरे,किशोर देवढे,अमित गोजे,समीर मानकर,रितेश गुढधे,धनंजय मोहले,पवन वाघमारे,आशिष कुबडे,संदीप प्रजापती, प्रवीण चरडे,संकेत कावळे,आदित्य खडसे, वृषभ कोल्हे, प्रद्यून इटनकर, ओम शेंडे,गणेश कुबडे यांनी परिश्रम केले

Previous articleचुंचाळे येथील सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील २७ गरजवंत विद्यार्थ्यांना ड्रेस व मिठाई वाटप..
Next articleवर्धा जिल्ह्यातील मंडळ अधिकारी लावणार निषेधात्मक काळ्या फिती