Home Breaking News जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या...

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधिक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

432

 

विकी वानखेड़े यावल

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची देखील बदली झाली आहे. आयएएस अधिकाऱ्यांनंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांची देखील बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची वर्णी लागली आहे. जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदलीचे पदस्थापना राखून ठेवण्यात आले आहे. लवकरच त्यांची पदस्थापना होण्याचे आदेश होण्याची शक्यता आहे.

Previous articleछत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न:
Next articleभारतीय जनता पार्टी च्या वतीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे,तहसीलदारांने निवेदनाची घेतली दखल: