Home Breaking News भारतीय जनता पार्टी च्या वतीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे,तहसीलदारांने निवेदनाची...

भारतीय जनता पार्टी च्या वतीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे,तहसीलदारांने निवेदनाची घेतली दखल:

128

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)दिनांक-१७/१०/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते की,जालना तालुक्यातील मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये हाहाकार माजवला असून,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन,कापूस,मका,तुर,द्राक्ष इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान,मदत जाहीर करुन वितरित करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जालना तालुक्याचे वतीने करण्यात आली होती.या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी आदेश काढून,ग्रामसेवक तलाठी,मंडळ अधिकारी,कृषी सहायक यांनी नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करावे या संदर्भात आदेश काढले आहे.या आदेशामध्ये असे म्हटले आहे की संबंधित अधिकारी,कर्मचारी पंचनामा करण्यास हलगर्जीपणा करत असेल तर त्यांना निलंबित करण्यात येईल त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने काळजीपूर्वक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्या पिकांचे अहवाल तहसीलदार यांना पाठवावे व विनाविलंब मदत मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष गजानन नरवडे यांनी केली आहे.

Previous articleजळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधिक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Next articleनगरपालिका प्रशासन जीवित हानी झाल्यावर पूल दुरुस्ती करणार का ?