सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- महाराष्ट्र सरकारकडून आनंदाचा शिधा योजना दिवाळी निमित्त स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप करण्यात येत आहे . या किट मध्ये 1 लिटर पॉमोलियम तेल, 1 किलो चणा डाळ, 1 किलो तुर डाळ, 1 किलो रवा देण्यात येणार असून नाममात्र फक्त 100 रुपयामध्ये हि किट राशन कार्डधारकांना मिळणार आहे हिंगणघाट शहर व ग्रामीण 51314 व समुद्रपूर शहर व ग्रामीण 28300 असे एकूण 79614 कुटुंबांना लाभ मिळणार आहे . प्रत्येक शासकीय स्वस्त धान्य दुकानात एक किट शंभर रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत आहे पण सरकारी स्वस्त धान्याचे दुकान संत चोखोबा वार्ड क्र.31
प्रो.सलीम काजी
लोक जनशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था हिंगणघाट या दुकानात दोन ते तीन दिवस रोज मजुरी पाडून गोरगरीब लोक ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्याकरता चक्क रांगेत उभे आहे म्हणजे जवळजवळ शंभर रुपयाचं राशन घेण्याकरिता 300 ते 400 रुपये रोजी पाडून राशन दुकानाच्या लाईनीत उभे असलेले दिसत आहेत राशन दुकानदाराला याचे कारण विचारले असता ते म्हणतात की सर्वर लिंक नसल्यामुळे असे प्रकार घडत आहे.
दिवाळी निमित्त राबवण्यात आलेली योजना आनंदाचा शिधा या योजनेसाठी तब्बल तीन वेळा हाताचे ठसे थंब घेण्यात येत आहे आणि नंतरच लाभार्थ्यांना राशन देण्यात येत आहे या प्रक्रियेत जवळजवळ एका व्यक्तीस 15 ते 20 मिनिटं या प्रक्रियेमध्ये जात आहे आणि त्यातच लिंक जात आहे यामुळे चक्क दोन ते तीन दिवस राशन दुकानांसमोर लोकांच्या रांगाच्या रांगा उभ्या आहेत… यामुळे आनंदाचा शिधा या योजनेची किट तर नाहीच नाही पण जे रेगुलर मिळणार राशन धान्य आहे ते सुद्धा मिळण्यात अडचण जात आहे. सर्व लिंक नाही त्यामुळे धान्य नाही अशीच समस्या राहिली तर दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकार कडून राबवण्यात येणारी आनंद शिधा योजना सर्वसामान्य जनतेला याचा लाभ मिळेल का ?
हिंगणघाट येथील सतीश खुशालराव गलांडे यांनी याबाबत व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून समोर आणली.
सुहास टोंग(हिंगणघाट पुरवठा निरीक्षक) :- महाराष्ट्रात कालपासून एकाच वेळेस आनंद दिघा किट वाटप होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मशीनवर दबाव आल्यामुळे सर्वर डाऊन झाले . वरिष्ठांकडून निर्देश आले की ऑफलाईन वाटप करण्यात यावे त्यानुसार आम्ही दुकानदाराला ऑफलाईन वाटप 23 ऑक्टोंबर रविवार पासून करायला सांगितले