Home वर्धा रोटरी क्लबची वडरसमाजाचे वस्तीत दिवाळी साजरी.

रोटरी क्लबची वडरसमाजाचे वस्तीत दिवाळी साजरी.

233

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:-स्थानिक रोटरी क्लब चे वतीने शहराला लागुन असलेल्या वडर समाजाचे वस्तीत दरवर्षी प्रमाणे दिवाळी साजरी करण्यात आली.
रोटरी क्लब सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो दिवाळी सारख्या सणात कोणीही वंचित राहु नये यासाठी आर्थीक परिस्थीतीने कमकुवत असलेल्या वर्गात जाऊन दिवाळी साजरी करुन त्यांनाही या आनंदोत्सवात सामिल करुन घेतले.
ही दिवाळी साजरी करण्यासाठी क्लबने मिठाई,नमकीन, दिपक,व सुगंधी साबणाचे सर्व वस्तीतील लोकांना डाॅ.मुखी, सहप्रांतपाल प्रा.माया मिहानी,शाकिरखान पठाण,पंकज देशपांडे, सुरेश चाैधरी,डाॅ.सतीश डांगरे यांचे हस्ते वितरीत करुन त्यांचेही चेहर्‍यावर आनंद निर्माण केला.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष पराग कोचर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की या दिवाळीत तुमच्याही जीवनात सुख समृध्दी आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावे याच हेतुने आम्ही आपणासोबत दिवाळी साजरी करीत आहे. कार्यक्रमाचे संयोजक प्रा अशोक बोंगिरवार हे होते तर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी पुडंलिक बकाणे, तारकेश्वर वांढरे , प्रभाकर साठवणे ,संजय शेंडे,मुरली लाहोटी , सतीष खियाणी यांनी सहकार्य केले.

Previous articleसंग्रामपुर मित्र परिवार आघाड़ी व प्रहार जनशक्ति पक्ष यांनी वृद्धाश्रमात केली दिवाळी साजरी
Next articleमुरपाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलकाचे अनावरण