Home Breaking News अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा लवकरच पडणार हातोडा !

अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा लवकरच पडणार हातोडा !

781

 

हिंगणघाट : 27 ऑक्टोबर

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

शहरासाठी अतिरिक्त पोलिस ठाण्याचे निर्मितीसह,बंद अवस्थेत असलेली सीसीटीवी यंत्रणा यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल,अवैध धंदे,वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्यात येणार असून यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी केले.
नवनियुक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी आज हिंगणघाट येथे लोकप्रतिनिधी,माध्यम प्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी हिंगणघाट बचाव समितीचे वतीने दामिनी पथकाची निर्मिती करुन शहरातील महिला व मुलींना न्याय देण्याची मागणीसह अवैध धंदे रोखण्याचीही मागणी करण्यात आली,पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी दामिनी पथक तसेच वेगळ्या वाहतूक पथकाची तात्काळ निर्मिती करण्याची मागणी मंजूर केली.
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नूकतेच रुजू झालेले आयपीएस अधिकारी नुरुल हसन यांनी आज शहरात भेट देऊन लोकप्रतिनिधी, सामान्य जनता तसेच पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिक पोलीस स्टेशन परिसरात आज त्यांनी सर्व सामान्य जनतेशी संवाद साधत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या यावेळी माजी आमदार अशोक शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी , पत्रकार, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंदे व त्यातून होणारी गुन्हेगारी व त्यातून वाढलेली गुन्हेगारी या विषयी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना माहिती देण्यात आली . शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था, अनेक वर्षापासून बंद असलेले सीसीटीव्ही यंत्रणा, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण करण्याकरिता शहराची वाढती लोकसंख्या पाहता अतिरिक्त पोलीस स्टेशनची मागणी इत्यादी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. नवोदित पोलीस अधीक्षकांनी यावेळी समाधानकारक उत्तरे देऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरता कायद्यातील कठोरात कठोर कारवाई करीत सामान्य जनतेला न्याय दिला जाईल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले.पोलिसांच्या कर्तव्याचे ठिकाणी लवकरच क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचीही माहिती नुरुल हसन यांनी यावेळी दिली.

Previous articleमुरपाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलकाचे अनावरण
Next articleश्री क्षेत्र नागझरी येथे अवैध धंद्यांना ऊत पोलीस प्रशासनाचे पाठबळ