इस्माईल इराणी शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव : शेगाव पासून जवळ असलेल्या गजानन महाराज यांचे गुरु श्री संत गोमाजी महाराज श्री क्षेत्र नागझरी असे प्रख्यात असलेले जुने संस्थान येथे अवैध धंद्यांना ऊत आला आहे याला पोलीस प्रशासनाचे पाठबळ असल्यामुळे हा धंदा येथे जोरात सुरू आहे याचा विरोध सर्व गावकऱ्यांनी केला होता परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाने काही मदत केली नाही. या धंद्यामुळे श्री क्षेत्र नागझरी येथील तरुण वर्ग पूर्ण या व्यसनाच्या आधीन झाला आहे.या गावांमध्ये वरली मटका गावरान दारू देशी दारू असे अनेक धंदे चालू आहेत. या धंद्यांपासून पोलीस स्टेशनला हप्ते जात असल्यामुळे हा धंदा कोणीही बंद करू शकत नाही .या धंद्यांचे अनेक वेळा पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही पोलीस स्टेशन ने आजपर्यंत हे धंदे बंद करू शकले नाहीत याचा अर्थ असा होतो की पोलीस प्रशासनाचे या धंद्यांना पाठबळ असल्यामुळे हा धंदा कोणीही बंद करू शकत नाही असे धंदेवाल्यांचे म्हणणे आहेत. या धंद्यांमुळे अनेक जनावर केसेस दाखल झाले आहेत तरीसुद्धा हे धंदे चालूच आहेत.