Home Breaking News सिंदखेडराजा राष्ट्रवादी कॉग्रेस ला दिवाळीत फटाके,राजेंद्र अंभोरे सह कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश

सिंदखेडराजा राष्ट्रवादी कॉग्रेस ला दिवाळीत फटाके,राजेंद्र अंभोरे सह कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश

305

 

प्रतिनिधी:(मुंबई) सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा धक्का बसला आहे.तबल 30 वर्षा सोबत एकनिष्ठ राहिलेले राजेंद्र अंभोरे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,खासदार प्रतापराव जाधव,माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिंदे गटांमध्ये प्रवेश केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक जी बोरकर,शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख आतिश भाऊ तायडे,सिंदखेडराजा शिवसेना शहर प्रमुख तथा नगरपरिषद सभापती बालाजी मेहत्रे,प्रदीप मेहत्रे,संतोष बर्डे हे प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस ला हा दुसरा धक्का आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मेहत्रे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे नामदार अतुलजी सावे,आमदार संजय भाऊ कुटे,विनोद भाऊ वाघ,विष्णू भाऊ मेहेत्रे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Previous articleकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा स्नेह मिलन कार्यक्रम व पालकमंत्र्यांचा सत्कार संपन्न:
Next articleगुन्हे प्रगटीकरण पथकाकाने लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना केली अटक