Home Breaking News गुन्हे प्रगटीकरण पथकाकाने लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना केली अटक

गुन्हे प्रगटीकरण पथकाकाने लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना केली अटक

280

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 27 ऑक्टोबर
फिर्यादी जख्मी नामे प्रज्वल विठठलराव वरभे वय 20 वर्शे रा. सातेफळ त. हिंगणघाट जि. वर्धा हे दि. 27 ऑक्टोंबर रात्री 9 वाजता दरम्यान आपले मोबाईल दुकानातील काम संपवुन त्याची एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. 32/ए.ए./0940 ने एकटे सातेफळ गावाकडे परत जात असता रात्री 9.15 ते 9.30 वाजता दरम्यान सातेफळ रोडवरील घोडे यांचे शेताजवळील विहीरीजवळ तिन अनोळखी ईसमांनी गाडीला आडवे होवुन गाडी थांबवीली नंतर फिर्यादी यास गाडीवरून हात धरून खाली पाडले. फिर्यादी यास लाथाबुक्क्याने मारहाण करून धारदार शस्त्राने शरीरावर ठिकठिकाणी वार करून जख्मी केले नंतर जख्मी फिर्यादी याचा रेडमी कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणी पॅंटचे खिष्यातील 1000/- रूपये जबरीने काढुन फिर्यादी जख्मी याची पांढऱ्या रंगाची एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. 32/ए.ए./0940 असा एकुण जुमला किंमत 46,000/- रू चा माल जबरीने चोरून घेवुन गेले. जख्मी/ फिर्यादी यांचे मृत्युपुर्व बयाणावरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्रमांक 1099/2022 कलम 394, 397, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात अन्वेषण अधिकारी श्री. सोमनाथ टापरे पोलीस उप निरीक्षक आणी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांनी व त्यांचे पथकाने कसोशीने आणि शीताफीने प्रयत्न करून आरोपी नामे 1) भोजराज तुकारामजी जंगले वय 37 वर्ष, रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट 2) आकाश उल्हास उईके वय 29 वर्ष, रा. सेलु मुरपाड आणी 3) निखीलअशोक भोकरे वय 18 वर्षे रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट यांना निष्पन्न करून ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातुन गुन्हयात जबरीने नेलेली पांढऱ्या रंगाची एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. 32/ए.ए./0940 किंमत 25,000/- रूपये, आरोपीतांचे दोन मोबाईल किंमत 20,000/- रूपये असा एकुण 45,000/- रू चा माल जप्त केला. पुढील तपास श्री. सोमनाथ टापरे, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यषवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार सोमनाथ टापरे पोलीस उप निरीक्षक यांचे सह गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रषांत वाटखेडेे, आषिश गेडाम, उमेष बेले, संग्राम मुंडे आणी सायबर सेल चे अनुप कावळे यांनी केली.

Previous articleसिंदखेडराजा राष्ट्रवादी कॉग्रेस ला दिवाळीत फटाके,राजेंद्र अंभोरे सह कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश
Next articleसरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोरपणा तहसील कार्यालयात शेतकऱ्याचे निवेदन