Home Breaking News सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोरपणा तहसील कार्यालयात शेतकऱ्याचे निवेदन

सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोरपणा तहसील कार्यालयात शेतकऱ्याचे निवेदन

105

 

कोरपना – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्या प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई मिळणे बाबत आमदार सुभाष धोटे व उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांना शेतकऱ्या तर्फे निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टी व पुरामुळे पैनगंगा वर्धा नदी तीरावरील भोयगाव ,भारोसा , एकोडी , पिपरी, अंतरगाव , कोडशी, इरई, परसोडा ,पारडी, जेवरा, रायपुर, मेहंदी, भोईगुडा, तुळशी आदी गावात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील बऱ्याच गावात तीन ते चारदा पिके खरवडून वाहून गेली. या अनुषंगाने शासनातर्फे १३ हजार ६०० रुपये ची मदत तीन हेक्टर पर्यंत जाहिर करण्यात आले. मात्र कोरपना तालुक्यात प्रत्यक्षात थातुर मातूर सर्व्हे करून अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे पुनच सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देते वेळी विजयराव बावणे
सुरेश मालेकर, किसन डोंगे, राजू ठाकरे, अविनाश लांजेकर, राजेंद्र पाचभाई, रमेश बोंडे, दिनकर टाले, घनश्याम काळे, बंडू गेडाम आदी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सुर्या मराठी न्यूज साठि मनोज गोरे कोरपणा-चंद्रपूर

Previous articleगुन्हे प्रगटीकरण पथकाकाने लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना केली अटक
Next articleपालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न व विविध विषयांवर चर्चा