Home Breaking News मंगल कार्यालयात मुक्कामी गेल्याचे पाहून चोरट्याने लग्न घरी केली चोरी

मंगल कार्यालयात मुक्कामी गेल्याचे पाहून चोरट्याने लग्न घरी केली चोरी

663

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट दि.३० ऑक्टोबर
घर बंद करुन मुलीचे लग्न असल्याने पाहुण्यासह सर्व कुटुंबिय मंगल कार्यालयात मुक्कामी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी नगदी रक्कमे सह सोनेचांदीचे दागिने चोरी केल्याची घटना आज दि.३० रोजी उघडकिस आली.
सदर घटना स्थानिक इंदिरा गांधी वार्ड येथील रहिवासी अशोक श्रावण फूलमाळी(६२) यांचे घरी काल रात्री घडली असून चोरट्यांनी नगदी रुपये ६ हजार ७०० व सोने चांदीचे दागीन्यासह
एकूण ३१ हजार,८०० रूपयांचा माल उडविला.
मिळालेल्या माहितीनुसार श्री अशोक फूलमाळी हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत,स्थानिक वसंत लॉन येथे त्यांची मुलगी कु.प्रिया हिचे लग्न असल्याने काल दि.२९ रोजी लग्नकार्यासाठी आलेल्या पाहुण्यासह सर्व कुटुंबिय विवाहस्थळी वसंत लॉन येथे निघुन गेले,घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी रात्रीतून हाथ साफ करीत ३ ग्राम वजनाची सोन्याची पोत,चाँदीचे इतर दागिने व रोख रक्कम असा एकूण ३१ हजार,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल उडविला.
आज सकाळी कुटुंबातील सदस्य मुलगी घरी गेल्यामुळे सदर चोरीची घटना उघडकिस आली.
घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल करण्यात आली असून पोलिस हवालदार परमेश्वर झामरे,नापोशी आशीष गेडाम हे पुढील तपास करीत आहेत.

Previous articleपोलीस अधीक्षक नुरल हसन यांना शहरात चार्ली पथक सुरू करा मागणी केली !
Next articleसावंगी तलाव ते बर्डी रस्ताचे काटेरी झुडूप देत आहे आपघाताला आमंत्रण: