Home Breaking News चार महिन्यात पाच प्रकल्प राज्याबाहेर वळवल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक.. शिंदे –...

चार महिन्यात पाच प्रकल्प राज्याबाहेर वळवल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक.. शिंदे – फडणवीस सरकारचा जाहीर निषेध.

358

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 31 ऑक्टोंबर विदर्भासह महाराष्ट्रातील पाच मोठे प्रकल्प बाहेर राज्यात गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनोले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

वेदांता फाँक्सकॉन ,बल्क ड्रम प्रकल्प, टाटा एअरबस, सॉफ्रन प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क हे पाच प्रकल्प चार महिन्यात राज्याबाहेर शिंदे- फडणवीस सरकारने वळविले, यामुळे महाराष्ट्रातील लाखो युवकांना रोजगारापासून मुकावे लागले आहे.
केंद्र सरकारने देशात तीन ड्रग प्रोजेक्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक प्रकल्पातून तीन हजार कोटींची गुंतवणूक व पन्नास हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने यातील एक प्रकल्पावर दावा केला होता.यासाठी रायगड मधील रोहा येथे होणाऱ्या प्रकल्पासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता.मात्र त्याला सरकारकडून हिरवी झंडी मिळाली नाही. आता हेच प्रकल्प गुजरात, हिमाचल प्रदेश,आंध्रप्रदेश येथे साकारण्यात येत आहे.
केंद्र सरकारने मेडिकल डिव्हाईस पार्क सुद्धा प्रस्तापित केले आहे.महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद येथे एका पार्कची मागणी केली होती. याप्रकल्पात ४२४ कोटींची गुंतवणूक होणार होती.तीन हजार तरुणांना रोजगार मिळणार होता. यासंदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने पाठविलेल्या प्रस्तावला अजुनही केंद्र सरकारने मंजुरी दिली नव्हती, आता हेच प्रकल्प गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रदेश,मध्य प्रदेश येथे साकार होणार आहेत. हे गेलेले प्रकल्प परत आणण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, अमोल बोरकर,युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन परासडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, विधानसभा अध्यक्ष तेजस तडस, विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, शहर अध्यक्ष पंकज पाके, शहर उपाध्यक्ष मनोज हुमार शहर, तालुका संघटक पंकज भट्ट,लिलाधर मडावी,प्रवीण जनबधु सचिन पराशर, विध्यार्थी तालुका अध्यक्ष रवीकरण कुटे, विध्यार्थी तालुका सचिव निखिल ठाकरे, प्रशांत मेश्राम, नदीम अली, मो.शाहिद, विपुल वाढई, अभय सावरकर, मनीष मुडे, वैभव भुते, प्रज्वल भगत, गोपाल निशाने, गणेश सातपुते, समीर भोयर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते..

Previous articleराष्ट्रवादी युवक अध्यक्ष ॲड देवकांत पाटील व शहराध्यक्ष हितेश गजरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या निषेधार्थ नायब तहसीलदार यांना निवेदन
Next articleजालना तालुक्यातील माळशेंद्रा येथे भाजपाचा झेंडा. (भाजपाच्या सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांची सरपंचपदी निवड).