Home Breaking News सावदा पोलीस ठाण्यातील एपीआयसह पीएसआय जाळ्यात लाच मागणी भोवली ;

सावदा पोलीस ठाण्यातील एपीआयसह पीएसआय जाळ्यात लाच मागणी भोवली ;

565

 

 

विकी वानखेडे

सावदा पोलीस ठाण्यातील एपीआयसह पीएसआय जाळ्यात
लाच मागणी भोवली
जळगाव :अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सावदा, ता.रावेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक देवीदास इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरलेमात्र ट्रॅपचा संशय आल्याने संबंधितांनी लाच स्वीकारली नसलीतरी लाच मागणी सिद्ध झाल्याने जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने आज मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Previous articleवारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. शिवशंकर वासुदेव पाटील (डिक्कर) यांची निवड.
Next articleसंग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर जो अन्याय झाला आहे त्या विरोधामध्ये शेगाव तालुका व शहर स्वस्त धान्य दुकानदार याच्या संघटनेतर्फे माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार तर्फे निवेदन देण्यात आले.