Home जालना मा.आ.नरेंद्र पवार साहेब (भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या जालना दौरा निमित्त...

मा.आ.नरेंद्र पवार साहेब (भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या जालना दौरा निमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय जालना येथे आढावा बैठक संपन्न:

175

 

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक ०३/११/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना येथे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये मा.नरेंद्र पवार-भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे दि.०५/११/२०२२ रोजी शनिवारी जालना येथे येणार आहेत.यानिमित्त संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली.व कार्यक्रमाची रूपरेषा व आढावा घेण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मा.भास्कर आबा दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सखोल असे मौलाचे मार्गदर्शन केले आहेत.तसेच जालना जिल्ह्यातील व तालुक्यातील भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.तसेच यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे,तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,गोवर्धन कोल्हे(स्वीय सहाय्यक),जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार,युवा अध्यक्ष उद्धव जायभाये व तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड,संजय रंधवे,विठ्ठल नरवडे,भारत मुटकुले याठिकाणी उपस्थित होते.

Previous articleलंम्पी आजारामुळे वखारी येथील पटावरचा बैल दगावला:
Next articleएमएसइबी चौकातील त्या खड्ड्यात पूजा करून मनसेचे आंदोलन