Home Breaking News एमएसइबी चौकातील त्या खड्ड्यात पूजा करून मनसेचे आंदोलन

एमएसइबी चौकातील त्या खड्ड्यात पूजा करून मनसेचे आंदोलन

198

 

शेगांव/प्रतिनिधी शेख इस्माइल

गेल्या एक महिन्या पासून स्थानिक एम एस इबी चौकात पडलेला मोठा खड्डा दुर्लक्षित असल्याने अनेक वेळा अपघात झाले दुचाकी चालक गंभीर जखमी झाले पण प्रशासन कोणतीच कार्यवाही करत नसल्याने आज दि 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर खड्ड्याची हार टाकून पूजा केली बेशरम चे झाड लावून प्रशासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना तहसीलदारां मार्फत निवेदन सादर केले निवेदनात नमूद आहे की
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शेगांव शहरातील एम एस इ बी चौकात पेव्हर ब्लॉक उखडल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून 5 फूट खोल झालेल्या या खड्ड्यात अनेक अपघात झाले आहेत तरीही सदर विभाग या गंभीर बाबीकडे काना डोळा करीत आहे या खड्ड्या बाबत 24 तासाच्या आत उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर मनसे तालुका प्रमुख रवींद्र उन्हाळे, शहर अध्यक्ष अमित देशमुख, नारायण शेगोकार, परमेश्वर राहुडकर, मनीष जाणे, रामेश्वर भारती, बाळू भोईटे, विनोद टिकार भास्कर खेळकर,दिगंबर खेळकर यांच्या सह्या आहेत
विकास आराखडा मध्ये करोडो रुपये खर्च झाल्यावरही रस्त्यावर असे खड्डे पडल्याने रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे

Previous articleमा.आ.नरेंद्र पवार साहेब (भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या जालना दौरा निमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय जालना येथे आढावा बैठक संपन्न:
Next articleस्व. विनोदभाऊ बुल्ले स्मृती प्रित्यर्थ शिव छत्रपती क्रीडा मंडळ, हिंगणघाट तर्फ भव्य कबड्डी सामने