Home Breaking News यावल येथे एका व्यक्तिची निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद...

यावल येथे एका व्यक्तिची निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद एका आठवडयातील आत्महत्याची पाचवी घटना

370

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहरातील धनगरवाडा परिसरात राहणार आहे का व्यक्तीने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर कचरे वय ५२ वर्ष धंदा मजुरी हे आपल्या कुटुंबासह राहत असून दिनांक ५ / ११ / २०२२ रोजी आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शोभाबाई कचरे यांना जाग आल्याने त्यांना राजेन्द्र कचरे हे खाटीवर मिळवुन आले नाही तेव्हा त्यांचा शोध घेतले असता तेव्हा कचरे हे आपल्या घरा समोरील धनगरवाडयातील स्वस्त धान्य दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या निंबाच्या झाडाला दोरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसुन आले आहे . या संदर्भातील मयत राजेन्द्र कचरे यांचा मुलगा धनराज राजेन्द्र कचरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . मयत राजेन्द्र कचरे यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले . घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . यावल तालुक्यातील आठवडयाभरातील आत्महत्या करण्याची ही पाचवी घटना सर्वत्र चर्चचा विषय .

Previous articleस्व. विनोदभाऊ बुल्ले स्मृती प्रित्यर्थ शिव छत्रपती क्रीडा मंडळ, हिंगणघाट तर्फ भव्य कबड्डी सामने
Next articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नांची लवकरच मंत्रीपातळीवर चर्चा उपमुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला (संलग्न भारतीय मजदूर संघ) आश्वासन