Home Breaking News कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हर्षल पाटील फदाट यांचा...

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हर्षल पाटील फदाट यांचा इशारा

255

 

राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.या वक्तव्यावरून आमदार,महिला नेत्या आणि कार्यकर्त्याही चांगल्याच संतापल्या आहेत.
हर्षल पाटील फदाट यांनीही अब्दुल सत्तारांना महाराष्ट्र फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.हर्षल पाटील म्हणाले की, शिंदे सरकारमधील मंत्री सातत्याने राजकारणातील महिलांविषयी अपशब्द वापरत आहेत. आज अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. अब्दुल सत्तार आपण किती दलिंदर विचारांचे आहात. आपण मंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात का? आपण जाणूनबुजून महिलांबाबत जे बोलता हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. तुम्ही सुप्रिया सुळे यांची माफी मागा,नसता यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तुमची मंत्री होण्याची लायकी नाही, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षल पाटील फदाट यांनी दिली आहे.

Previous articleहिंगोणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे तिन तेरा शासनाचे४७ लाख पाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गावाला कवडीमात्र फायदा नाही
Next articleमुख्यमंत्री शिंदेंनी कान टोचल्यानंतर अब्दुल सत्तार अज्ञातवासात