Home Breaking News यावल चोपडा मार्गावर मालट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यु पोलीसात...

यावल चोपडा मार्गावर मालट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यु पोलीसात गुन्हा दाखल

548

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल चोपडा राज्य मार्गावरील रस्त्यावर वाहनचालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात एका मृत्यु झाला असुन , पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार दिनांक ९नॉव्हेबरच्या रात्री ९ वाजता यावल चोपडा मार्गा वरील केसरबाग हॉटेल जवळ ट्रक वाहन चालक राजु गोविंदसिंग ( गब्बर भाई ) राहणार इधलपुर तालुका मणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची १० चाकी मालट्रक वाहन क्रमांक आरजे ११जीए ७३८०हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मोबाईल बोलत भारद्याव वेगाने वाहन चालवित असतांना , चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने मालट्रक मधुन निघुन उडी मारीत असतांना रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या एका झाडावर मालट्रक आदळुन झालेल्या भिषण अपघातात स्वत गंभीर जख्मी होवुन मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत ठरला आहे . याबाबत महावीर कन्हैलाल राजपुत वय २८वर्ष राहणार ईधलपुर तालुका माणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वाहनचालक राजु गोविंदसिंग यांच्या विरूद्ध भादवी कलम३o४ ( अ ) २८९ , ३३७, ३३८ कलमासह मोटर वाहन कायदा नियम १८४ ( सी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या अपघाताचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Previous articleठाकरे गटाचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांच्या जामीनवर सुटका झाल्याचा आनंद शिवसेनेकांनी फटाकेच्या आतिषबाजीत जल्लोषात केला आनंद
Next articleविरेगाव ग्रामपंचायत एक पाऊल पुढे थेट डोर टू डोर आयुष्मान कार्ड के वाय सी योजना.