Home Breaking News रानमांजरच्या पिल्लाला समजले बिबट्याची पिल्ले

रानमांजरच्या पिल्लाला समजले बिबट्याची पिल्ले

94

 

@ बटवाडी शिवारात पसरले होते भीतीचे वातावरण

बाळापुर तालुक्यातील बटवाडी शेतशिवारात एका शेतकऱ्याना दोन पिल्ले दिसली ती पिल्ले बिबट्यांची समजुन लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी पिल्ला सोबत बिबट व मादी पण असेल म्हणून तो रस्स्त्याच बंद केला होता. या बाबत त्वरीत गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले यावेळी वनविभागाचे अधिकारी आर एफ ओ राजसिंह ओवे यांनी वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक संघपाल तायडे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, यशपाल इंगोले, अक्षय पांढरे व मोहोड या रेस्कू टिमला घटनास्थळी पाठविले असता बाळ काळणे यांनी सदर पिल्ले हातात घेऊन शाहनिशा केली असता ती पिल्ले रानमांजराची निघाली ती अंत्यंत छोटी व चांगल्या अवस्थेतअसल्याने तिथेच सोडणे योग्य असल्याने सदर पिल्लांना शेतातच सोडण्यात आले यावेळी वन विभागाच्या चमुने उपस्थित गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले व त्यांच्या मधली भीती दूर केली या प्रसंगी ज्ञानेश्वर आखरे, दत्ता आखरे, जगन्नाथ आखरे, अंकुष मते, अरविंद कोकाटे,आदी गावकरी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

सुर्या न्यूज तालुका प्रतिनिधी संतोष काळे बाळापूर अकोला
_________________________________

Previous articleविरेगाव ग्रामपंचायत एक पाऊल पुढे थेट डोर टू डोर आयुष्मान कार्ड के वाय सी योजना.
Next articleआनंद गोसकी यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र. ०८ मधील ४०० लाभार्थ्यांचे ‘धन्यवाद, मोदीजी !’ शुभेच्छा पत्र